प्रवाशाकडून हवाई सुंदरीचा विनयभंग

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

नवी दिल्ली- मस्कतवरून दिल्लीकडे येणाऱया विमानामध्ये एका प्रवाशाने हवाई सुंदरीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मस्कतवरून एआय 974 हे विमान दिल्लीकडे येत होते. विमान दिल्लीजवळ आल्यानंतर याबाबतची माहिती हवाई सुंदरी प्रवाशांना देत होती. यावेळी एका प्रवाशाने हवाई सुंदरीला अनेकदा स्पर्श करून असभ्य भाषा वापरली. याबाबतची माहिती तिने कॅप्टनला दिली. विमानतळावर विमान उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. हवाई सुंदरीने तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हवाई सुंदरीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रवाशांनीही चौकशीदरम्यान दिली. याबाबत पुढील तपास सुरू असून, प्रवाशावर कडक कारवाई केली जाईल, असे अधिकाऱयांनी सांगितले.

Web Title: Airhostess alleges sexual harassment by passenger

टॅग्स