एअरटेलची ग्राहकांना भेट; 3GB डेटा मोफत

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ नंतर दूरसंचार क्षेत्रात स्पर्धा निर्माण झालेली असताना 'एअरटेल'ने 4G सेवा वापरणाऱ्या आपल्या ग्राहकांना 31 डिसेंबर 2017 पर्यंत दरमहा 3GB डेटा निशुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे.

'एअरटेल'ने आज याबाबत माहिती दिली आहे. जे ग्राहक सध्या एअरटेलशिवाय अन्य सेवा वापरत आहेत त्या ग्राहकांनी 28 फेब्रुवारीपर्यंत एअरटेलच्या 4G सेवा वापरण्यास सुरूवात केल्यास त्यांना 31 डिसेंबर 2017 पर्यंत दरमहा 3GB डेटा निशुल्क उपलब्ध होणार आहे. या सेवेचे मूल्य 9 हजार रुपये एवढे आहे. ही सेवा एअरटेलच्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी लागू असणार आहे. ही सेवा वापरण्यासाठी प्रीपेड ग्राहकांना दरमहा 345 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. त्यामध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य एसटीडी कॉल्ससोबत 1GB डेटा मिळणार आहे. याशिवाय, ग्राहकांना 3GB डेटा विनामूल्य मिळणार आहे.

Web Title: AIRTEL new 3GB data offer