अजय बिसारिया मायदेशी परतले

सकाळ वृत्तसेवा | Monday, 12 August 2019

पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध तोडल्यानंतर पाकमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया हे आज मायदेशी परतले. जम्मू- काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम भारताने संपुष्टात आणल्यानंतर पाकनेही द्विपक्षीय राजनैतिक संबंधांची पातळी घटवित भारतासोबतची चर्चेची दारे कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.