'एसपीजी'च्या अध्यक्षपदी अजित दोवल

Ajit Doval is the Become Chairman of SPG
Ajit Doval is the Become Chairman of SPG

नवी दिल्ली : 'स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप'च्या (एसपीजी) अध्यक्षपदी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांची नियुक्त करण्यात आली आहे. अजित दोवल यांच्याकडे यापूर्वी 'एसपीजी'च्या कॅबिनेट सचिवपदाचा कार्यभार होता. मात्र, केंद्र सरकारने आता त्यांच्या जबाबदारीत वाढ केली आहे.   

परदेशी, देशांतर्गत आणि आर्थिक सुरक्षा प्रकरणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एनएससी) मदतीसाठी 1999 मध्ये एसपीजीची स्थापना करण्यात आली होती. दोवल यांच्याकडे ही नवी जबाबदारी देण्यात आल्याने ते सर्वांत शक्तीशाली सरकारी अधिकारी बनले आहेत. त्यामुळे आता अजित दोवल हे एसपीजीच्या बैठकांचे नियोजन करणार आहेत. याशिवाय कॅबिनेट सचिवांनी घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत विविध मंत्रालये आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याचे काम केले जाणार आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने 11 सप्टेंबरला याबाबत अधिसूचना जारी केली होती. सरकारच्या या अधिसुचनेनुसार आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना या समूहाचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com