आकाश, ईशा अंबानीचा फॉर्च्युनच्या श्रीमंतांच्या यादीत समावेश; बड्या कंपन्यांना टक्कर

विनोद राऊत
Thursday, 3 September 2020

  • मुकेश अंबानी यांच्या नंतर त्यांच्या मुलांचेही नाव फॉर्च्युन मॅग्झिनच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आले आहे. फॉर्च्युनने '40 अंडर 40' या यादीत ईशा आणि आकाश अंबानीचा समावेश केला आहे.
  • बायजू या ऑनलाईन शिक्षण तंत्रज्ञान कंपनीचे संचालक बायजू रवीद्रंन यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात या कंपनीने ऑनलाईन शिक्षणात चांगलाच जम बसवला आहे.

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या नंतर त्यांच्या मुलांचेही नाव फॉर्च्युन मॅग्झिनच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आले आहे. फॉर्च्युनने '40 अंडर 40' या यादीत ईशा आणि आकाश अंबानीचा समावेश केला आहे. वित्त, तंत्रज्ञान, राजकारण, आरोग्य, माध्यम आणि करमणूक या क्षेत्रातील जगभरातील चाळीशीच्या आतमधील 40  प्रभावशाली व्यक्तींचा यादीत समावेश आहे. बायजू या ऑनलाईन शिक्षण तंत्रज्ञान कंपनीचे संचालक बायजू रवीद्रंन यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात या कंपनीने ऑनलाईन शिक्षणात चांगलाच जम बसवला आहे.

ही बातमी वाचली का? दिल्लीची मेट्रो सोमवारपासून धावणार; महाराष्ट्रात कधी?

रिलायन्स जिओचा व्यापार वाढवण्यात ईशा आणि आकाश अंबानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. फेसबुकने 5.7 अब्ज डॉलर ओतत जिओमध्ये नुकतीच 9.99 टक्के भागीदारी खरेदी केली. या वाटाघाटीसाठी दोघांनी पुढाकार घेतला होता, या शब्दात फाॅर्च्युनने दोघांचे कौतूक केले. गूगल, इंटेल सारख्या महत्त्वाच्या टेक कंपन्यांना जिओशी जोडण्यात आणि त्यांची गुंतवणूक आणण्याचे काम या दोघांच्या नेतृत्वात पुर्ण झाले, असेही फाॅर्च्युनने म्हटले आहे.

ही बातमी वाचली का? विद्यार्थ्यांना AK-47 हाती घेण्यासाठी भडकावणारा शिक्षक; UnAcademy दिलं स्पष्टीकरण

कोरोना संसर्गाच्या काळात या दोघांनीही अतिशय प्रभावी काम केले, अशी स्तुती या मॅग्झिनने केली आहे. आपले शिक्षण पुर्ण केल्यानंतर आकाश आणि ईशा अंबानी 2014 मध्ये रिलायन्समध्ये सक्रीय झाले. जिओमार्ट सुरु  करण्यात दोघांनी पुढाकार घेतला होता. जिओमार्ट ई कॉमर्स क्षेत्रात एक महत्त्वाचे डिजीटल प्लॅटफॉर्म म्हणून अल्पावधीतच पुढे आले आहे. जिओ मार्टवर दररोज लाखो ऑर्डर येतात. 

ही बातमी वाचली का? फक्त दहा रुपयात 'मोदी इडली'; अम्मा इडलीला देणार टक्कर

बड्या कंपन्यांना टक्कर
आकाश आणि इशा अंबानीच्या नेतृत्वात जिओमार्ट हे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई कॉमर्सच्या बड्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. आकाश अंबानी यांनी ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. तर, ईशाने येल आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण पुर्ण केले.
------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akash, Isha Ambani included in Fortune's rich list; Collision with big companies