मुस्लिमांनो, वाघासारखे बना; अकबरुद्दिन ओवेसी यांचा सल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

- गेल्या काही महिन्यांपासून अकबरुद्दीन होतो आजारी. 

- आजारपणातून बाहेर आल्यानंतर केली आरएसएसवर टीका.

करीमनगर : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन'(एआयएमआयएम) या पक्षाचे नेते अकबरुद्दिन ओवेसी यांनी झुंडशाहीवर बोलताना मुस्लिमांनी वाघासारखे बनावे, असा सल्ला बुधवारी दिला. 

"मुस्लिमांनी वाघासारखे बनावे, म्हणजे कुणीही चहावाला समोर उभा राहून शकणार नाही,'' असे आवाहन करीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ""चौकीदार नरेंद्र मोदी यांना मी ट्विटरवर पाहिले. त्यांनी त्यांच्या आधारकार्ड व पासपोर्टवरही चौकीदार अशी नोंद करावी. देशाला पंतप्रधान हवा आहे, चहावाला किंवा पकोडेवाला नाही. त्यांना तसे वाटत असेल, तर त्यांनी माझ्याकडे यावे, मी त्यांना चौकीदाराची टोपी आणि शिट्टी देईन,'' असे ते म्हणाले. 

"झुंडशाहीची दहशत माजवणारे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले (आरएसएस) आपल्याला घाबरतात. "आरएसएस'वाले आमचे काहीही वाकडे करू शकत नाही. जग त्यांनाच घाबरवते, जे घाबरतात. जग ज्यांना घाबरते जे घाबरवू शकतात.

अकबरुद्दिन ओवेसीबद्दल राग यासाठी आहे की ते मला घाबरतात, असे व्यक्तव्यही त्यांनी केले. याच वेळी त्यांनी 2013 मधील 15 मिनिटांच्या भाषणाचा उल्लेखही केला आहे. 15 मिनिटांचा जो आघात "आरएसएस'वर झाला आहे, तो अजून भरून आलेला नाही, असे म्हणत त्यांनी पुन्हा संघाला लक्ष्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akbaruddin Owaisi Criticizes on RSS