खासदार ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन यांची प्रकृती नाजूक

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जून 2019

- लंडनमध्ये सुरु आहेत उपचार.

- उलट्यांचा होत आहे त्रास.

नवी दिल्ली : 'ऑल इंडिया मज्लिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमिन'चे (एमआयएम) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती नाजूक आहे. अकबरुद्दीन यांच्यावर लंडनमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती सुधारली नसून, त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आहे. 

अकबरुद्दीन ओवेसी हैदराबादमधील चंद्रयानगुट्टा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. 2011 मध्ये एक घटना घडली होती. यामध्ये अकबरुद्दीन यांना गोळी लागली होती. त्यानंतर त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार केले जात आहेत. उपचार सुरु असताना तीन दिवसांपूर्वी अकबरुद्दीन यांना पुन्हा उलट्या होण्यास सुरवात झाली. तसेच पोटातही दुखू लागले.

दरम्यान, अकबरुद्दीन लवकर बरे व्हावेत, यासाठी जगनमोहन रेड्डी यांनी ट्विटवरून प्रार्थना केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akbaruddin Owaisi Health Serious Treatment In London