पराभवाच्या चिंतेतून अखिलेश यांचे बदनामीकारक वक्तव्य : नायडू

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - गुजरात पर्यटनासंदर्भात केलेल्या जाहिरातीबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केलेल्या टिपणीवर केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी यादव यांच्यावर टीका केली आहे. अखिलेश यादव यांनी पराभवाच्या चिंतेतून असे बदनामीकारक वक्तव्य केल्याची टीका नायडू यांनी केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी गुजरात पर्यटनासाठी एक नवी जाहिरात केली आहे. ज्यात कच्छच्या रणातील दुर्मिळ गाढवांना दाखविण्यात आले असून, ते पाहण्यासाठी गुजरातला भेट द्या, असे आवाहन अमिताभजींनी केले आहे. 'अमिताभजी तुम्ही गाढवांच्या जाहिराती करणे बंद करा', अशी विनंती करत अखिलेश यादव यांनी गुजरात सरकारच्या जाहीरातींवरही तोंडसुख घेतले.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना नायडू म्हणाले, 'ते निराश झाले आहेत. त्यामुळेच ते अशा प्रकारचे बदनामीकारक वक्तव्य करत आहेत. पराभवाच्या चिंतेतून त्यांनी असे वक्तव्य केले आहे. ते गुजरातच्या जनतेचा अपमान करत आहेत. आठ मार्च (मतदानाचा शेवटचा दिवस) जवळ येत असल्याने आणि त्यांचे भवितव्य मतदान मशीमध्ये बंद होणार असल्याने ते निराश झाले आहेत.'

Web Title: Akhilesh is disturbed : Naidu on Gujarat Tourism's 'gadha' ad