राहुल आणि अखिलेश यांची पत्रकार परिषद रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची आज (सोमवार) होणारी संयुक्त पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. अखिलेश यादव यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

वाराणसी - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची आज (सोमवार) होणारी संयुक्त पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. अखिलेश यादव यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अखिलेश यादव आज उत्तर प्रदेशमध्ये एकुण सात सभा घेणार असल्याने वेळेअभावी ही पत्रकार परिषद रद्द केल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी मागील महिन्यात राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली होती ज्यामध्ये त्यांनी मोदींवर कठोर टीका केली होती. सपा-काँग्रेस मिळुन उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करेल असा दावाही त्यांनी यावेळी केला होता. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या निकालानंतर मोदींची बिहारसारखी परिस्थिती होईल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

वाराणसीमध्ये 8 मार्चला मतदान होणार आहे. पंतप्रधान मोदीं आणि राहुल गांधी-अखिलेश यादव यांनी शनिवारी वाराणसीमध्ये रोड शो केला होता. ज्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता.

Web Title: Akhilesh-Rahul's joint press conference in Varanasi cancelled