अखिलेश यांची रथयात्रा 'इमेज मेकओव्हर'साठी- बसप

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

भडोरिया म्हणाले, "मद्य माफिया, भूखंड माफिया, खाण माफिया अशा सर्वांना समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात बळ मिळाले आहे. अखिलेश यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या लोकांना सांगण्यासाठी काहीच नाही. अखिलेश यांनी त्यांच्या कार्यकालात काय केले आहे हे उत्तर प्रदेशच्या लोकांना माहीत आहे. ही रथ यात्रा केवळ त्यांची प्रतिमा बदलण्यासाठी (इमेज मेकओव्हर) आहे."

नवी दिल्ली- "पक्षाची कामगिरी लोकांपर्यंत पोचविण्यासाठी अशा प्रकारच्या यात्रा काढल्या जातात. मात्र, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने मागील पाच वर्षांत काहीच केलेले नाही. ही रथ यात्रा म्हणजे केवळ 'इमेज मेकओव्हर'साठी आहे," अशा शब्दांत समाजवादी पक्षाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या 'विकास रथ यात्रे'ची खिल्ली बहुजन समाज पक्षाने उडवली आहे.

उत्तर प्रदेशने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली खूप दुःख सोसले आहे, अशी टीका 'बसप'चे नेते सुधींद्र भडोरिया यांनी केली.
भडोरिया वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे राज्यातील लोकांना सांगण्यासारखे काहीही नाही. ही विकास रथ यात्रा खरे तर पक्षाचे अपयश झाकण्यासाठी काढण्यात येत आहे."

"जेव्हा कोणी अराजकीय व्यक्ती अशी यात्रा काढते तेव्हा ती लोकांना मागील काही वर्षांतील कामगिरी सांगण्यासाठी असते. सध्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था अतिशय नाजूक आहे. जातीय हिंसाचार, दंगली आणि रक्तपात एकामागून एक चालू आहेत. मुझफ्फरनगर दंगलीतील हिंसाचार तर सर्वांत भयंकर होता. हे सर्व अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली घडले," असे भडोरिया म्हणाले.

"मद्य माफिया, भूखंड माफिया, खाण माफिया अशा सर्वांना समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात बळ मिळाले आहे. अखिलेश यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या लोकांना सांगण्यासाठी काहीच नाही. अखिलेश यांनी त्यांच्या कार्यकालात काय केले आहे हे उत्तर प्रदेशच्या लोकांना माहीत आहे. ही रथ यात्रा केवळ त्यांची प्रतिमा बदलण्यासाठी (इमेज मेकओव्हर) आहे," असे त्यांनी सांगितले.

Web Title: Akhilesh' vikas rath yatra is for image makeover, says BSP