अखिलेश यादव 'नमाजवादी पक्षा'चे अध्यक्ष : अमरसिंह

वृत्तसंस्था
रविवार, 26 ऑगस्ट 2018

''मी तुमचे कौटुंबिक वाद सोडविले आहेत. मात्र, मी जेव्हा अडचणीत होतो. तेव्हा अखिलेश तुम्ही किंवा तुमचे पिता मुलायमसिंह यांनी आमचे ऐकले नाही''.

- अमरसिंह, खासदार, राज्यसभा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर राज्यसभा खासदार अमरसिंह यांनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे अध्यक्ष नसून, ते 'नमाजवादी पक्षा'चे अध्यक्ष आहेत. याबाबतचा व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. यामध्ये अमरसिंह यांनी अखिलेश यांच्यासह आजम खान यांच्यावर टीकास्त्र सोडले.

काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांनी सांगितले होते, की जर त्यांचा पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास उत्तर प्रदेशमध्ये विष्णू देवाचे भव्य मंदिर बांधण्यात येईल आणि त्याला विष्णूनगरनुसार विकसित करण्यात येईल. अखिलेश यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त करत अमरसिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली.

अमरसिंह यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले, की ''अखिलेश यादव तुम्हाला विष्णूचे मंदिर बनविण्याचा अधिकार आहे. तुम्ही समाजवादी पक्षाचे अध्यक्ष नाही तर तुम्ही 'नमाजवादी पक्षा'चे अध्यक्ष आहात. तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी बनविलेले राजकीय पुत्र मोहम्मद आजम खानने भडकावू वक्तव्य केले होते. यामध्ये आजम खानने सांगितले, की अमरसिंह यांच्यासारख्या लोकांना कापून टाकले पाहिजे. त्यांच्या तरुण मुलींवर अॅसिड फेकायला हवे''.

दरम्यान, ''मी तुमचे कौटुंबिक वाद सोडविले आहेत. मात्र, मी जेव्हा अडचणीत होतो. तेव्हा अखिलेश तुम्ही किंवा तुमचे पिता मुलायमसिंह यांनी आमचे ऐकले नाही'', असेही अमरसिंह म्हणाले.  

Web Title: Akhilesh Yadav is Chairman of Namajwadi Party Criticizes Amar Singh