अखिलेश यादवांच्या ताफ्याला भीषण अपघात; सहा वाहनांची समोरासमोर धडक, चार जण गंभीर जखमी I Accident News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akhilesh Yadav Accident News

सपा अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) शहरातील सपा कार्यालयातून हरिपालपूरला जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली.

Accident News : अखिलेश यादवांच्या ताफ्याला भीषण अपघात; सहा वाहनांची समोरासमोर धडक, चार जण गंभीर जखमी

हरदोई जिल्ह्यातील (Hardoi District) मल्लावन पोलीस स्टेशन परिसरात (Mallawan Police Station) माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या ताफ्यातील अर्धा डझनहून अधिक वाहनं एकमेकांवर आदळली.

यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) शहरातील सपा कार्यालयातून हरिपालपूरला जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली.

शुक्रवारी दुपारी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या ताफ्याची वाहनं कटरा बिल्हौर महामार्गावरील फरहतनगर रेल्वे क्रॉसिंगवरील ब्रेकरजवळून गेली. ब्रेकरमुळं भरधाव वेगानं धावणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या गाडी चालकानं अचानक ब्रेक लावला, त्यामुळं एकत्र धावणाऱ्या दोन फॉर्च्युनरसह सात वाहनांची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात सुमारे चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. यामध्ये नसीम खान (28) रा. रुदामाऊ पोलीस स्टेशन मधौगंज, मुनेंद्र यादव (35) रा. बिलग्राम मल्लावन सीएचसी आणि वसीम वारसी (60) रा. संदिला यांचा समावेश आहे.