Video : ‘जय श्रीराम’चा नारा देताच भर सभेत काय झाले पाहा...

वृत्तसंस्था
Sunday, 16 February 2020

कन्नोज : येथील समाजवादी पक्षाच्या महिला संमेलनादरम्यान एका तरुणाला मारहाण करण्यात आली. यावरून सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कन्नोज : येथील समाजवादी पक्षाच्या महिला संमेलनादरम्यान एका तरुणाला मारहाण करण्यात आली. यावरून सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सपाचे अखिलेश यादव व्यासपीठावर भाषण देत असताना एका तरुणाने रोजगारसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. अखिलेश यांनी त्यांना पुढे येण्यास सांगितले. तरुण जसा व्यासपीठाजवळ आला त्याने मोठ्याने ‘जय श्रीराम’चा नारा दिला. यावर अखिलेश यादव म्हणाले की, मी विष्णू भगवानला मानतो...कृष्ण भगवानलाही मानतो...याचा अर्थ मी कायम हेच बोलत नाही. यानंतर उपस्थित सपा नेत्यांनी त्या तरुणाला भाजप कार्यकर्ता म्हणत मारहाण केली.

पुणे विमानतळावर अपघात होता होता वाचला; वाचा काय घडले!

यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला गर्दीतून बाहेर काढले. या तरुणाच्या वक्तव्यावर अखिलेश यादव खूप नाराज झाले. आणि त्यांनी व्यासपीठाच्या सुरक्षिततेवरुन तैनात असलेल्या तालग्रामचे इन्स्पेक्टर राजा दिशेन सिंह यांना फटकारले. पोलीस तैनात असताना भाजपाचा माणूस येथे कसा आला. ते म्हणाले, तरुणाकडे बॅग होती. त्यात काय होतं कुणाला माहिती? त्याची बॅग तपासायला हवी होती.

प्रेरणादायी : चौदा वर्षे काढली जेलमध्ये, 40व्या वर्षी बनला डॉक्टर

अखिलेश इतकं म्हणून थांबले नाही तर त्यांनी जोपर्यंत पोलीस त्या तरुणाचं नाव आणि पत्ता देत नाहीत तोपर्य़ंत ते कुठेही जाणार नसल्याची चेतावणी दिली. भाषण संपल्यानंतर अखिलेश यांनी पुन्हा तरुणाचे नाव आणि पत्ता विचारला.

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अखिलेश म्हणाले, की ''आमच्या सभांमध्ये भाजप कार्यकर्त्यांना पाठवून आमचा कार्यक्रम उधळविण्याचा प्रयत्न करू शकत नाही. अखिलेश म्हणाले, मी त्या मुलाला तुरूंगात टाकू नका, असे प्रशासनाला सांगेन. पण त्या मुलाची आणि त्याचा वडिलांशी आमची भेट घडवून आणा. कारण सभा रोखण्यामागचं कारण तरी लक्षात येईल.

शांततेचा भंग केल्याबद्दल तरुणांवर कारवाई केली जात असल्याचे सदर कोतवाल विनोद मिश्रा यांनी सांगितले. हा युवक गुगरापूरचा राहणारा असून अशोक कुमार शुक्ला असे या त्याचे नाव आहे. जो बी.ए. केल्यानंतर एलएलबी करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhilesh yadav gets irritated by the slogan of jai shriram