अखिलेश यादव लढविणार कन्नौजमधून लोकसभा निवडणूक

पीटीआय
मंगळवार, 23 जानेवारी 2018

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुलायमसिंह यादव हे आझमगड आणि मैनपुरी या दोन्ही ठिकाणांहून विजयी झाले होते; मात्र त्यानंतर त्यांनी पूर्व-उत्तर प्रदेशात पक्ष मजबूत करण्यासाठी आझमगडची निवड केली होती. त्यानंतर त्यांनी मैनपुरी येथील जागेचा राजीनामा दिला होता. त्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा नातू तेजप्रताप यादव हे विजयी झाले होते

लखनौ - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे कन्नौज येथून निवडणूक लढविणार आहेत. सध्या त्यांच्या पत्नी डिंपल यादव या त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

जनेश्‍वर मिश्रा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, की आपण आगामी लोकसभेची निवडणूक कन्नौज येथून लढविणार आहोत. एका प्रश्‍नाला उत्तर देताना अखिलेश म्हणाले, की "नेताजी' मुलायमसिंह यादव हे मैनपुरी येथून निवडणूक लढविणार आहोत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुलायमसिंह यादव हे आझमगड आणि मैनपुरी या दोन्ही ठिकाणांहून विजयी झाले होते; मात्र त्यानंतर त्यांनी पूर्व-उत्तर प्रदेशात पक्ष मजबूत करण्यासाठी आझमगडची निवड केली होती. त्यानंतर त्यांनी मैनपुरी येथील जागेचा राजीनामा दिला होता. त्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा नातू तेजप्रताप यादव हे विजयी झाले होते.

Web Title: akhilesh yadav loksabha samajwadi party uttar pradesh