निकालानंतर अखिलेश यादवांनी घेतली वडिलांची भेट; मुलायम सिंह म्हणाले, 'तुझी ही...'

निकालानंतर अखिलेश यादवांनी घेतली वडिलांची भेट; मुलायम सिंह म्हणाले, 'तुझी ही...'

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष काल रविवारी पहिल्यांदा आपले वडील मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली आहे. यूपीचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव काल रविवारी समाजवादी पक्षाच्या ऑफिसवर पोहोचले. या ठिकाणी त्यांची भेट अखिलेश यादव तसेच पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांशी झाली. त्यांनी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना आशीर्वाद दिला आणि निवडणुकीमध्ये अधिक चांगल्या कामगिरीसाठी त्यांना प्रेरणा दिली. त्यांनी म्हटलं की, तुझी कामगिरी चांगली होती. तू चांगला लढलंस, खूप खूप अभिनंदन आणि भविष्यासाठी सदिच्छा...

निकालानंतर अखिलेश यादवांनी घेतली वडिलांची भेट; मुलायम सिंह म्हणाले, 'तुझी ही...'
...तर आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार; सोनिया गांधींनी केलं स्पष्ट

यूपी निवडणुकीचा निकाल दहा मार्च रोजी घोषित झाला. त्यानंतर मुलायम सिंह यादव पहिल्यांदाच रविवारी सपाच्या कार्यालयावर पोहोचले. या दरम्यान अखिलेश यादव यांनी पायाला स्पर्श करुन आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी मुलायम सिंह यादव यांनी निवडणुकीमध्ये अधिक चांगल्या कामगिरीसाठी सदिच्छा दिल्या. तसेच भविष्यात नव्या उर्जेसह आणि उत्साहासह निवडणुकीमध्ये लढण्यासाठी प्रोत्साहित केलं.

आधीपेक्षा चांगली कामगिरी

यूपी निवडणुकीमध्ये भाजपच्या युतीला २७३ जागांवर विजय मिळाला आहे तर समाजवादी पक्षाच्या नेतृत्वातील विरोधकांना १२५ जागांवर विजय मिळाला आहे. एकट्या भाजपला २५५ जागा मिळाल्या आहेत तर सपाला १११ जागा मिळाल्या आहेत. गेल्यावेळी सपाला कमी जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपला ५७ जागांचं नुकसान झालं असून सपाचं ६४ जागांचा फायदा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com