Vikas Dubey Encounter,Akhilesh Yadav,  Uttar Pradesh police ,UP government
Vikas Dubey Encounter,Akhilesh Yadav, Uttar Pradesh police ,UP government

सरकार ऐवजी गाडी पलटी झाली, माजी मुख्यमंत्र्यांचा योगी सरकारवर थेट आरोप

लखनऊ : कानपूरमध्ये पोलिसांवर हल्ला करुन पसार झालेल्या कुख्यात गुंड विकास दुबे पोलिस चकमकीत मारला गेला आहे. त्याला घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्याने पोलिसांकडील हत्यार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला, असे सांगितले जात आहे. मात्र या प्रकरणावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडण्यास सुरुवात झाली आहे.  उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एन्काउंटरची वेळी आणि पद्धतीवर आक्षेप घेत काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत.

वाहन पलटी झाल्यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला हे स्पष्टीकरण संभ्रमात टाकणारे आहे. त्याला पळूनच जायचे होते तर त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीनच का केले? वाहन पलटी झालेले नाही तर सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणला आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.  विकास दुबेला मध्ये प्रदेशमधील उज्जैनमधून कानपुरला नेण्यात येत होते. STF टीमच्या वाहनाचा उत्तर प्रदेशच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर काही अंतरावरच अपघात झाला. याघटनेनंतर पोलिसांनी विकास दुबेचा खात्मा केला. ही घटना कानपूर टोल प्लाझापासून 25 किलोमीटर अंतरावर झाली.

 एका अधिकाऱ्यासह 8 पोलिसांना गोळीबारात जीवे मारुन विकास दुबे पसार झाला होता.  कानपूर गोळीबाराच्या हत्याकांडानंतर तब्बल सातव्या दिवशी  विकास दुबेला मध्यप्रदेशमधील उज्जैन स्थित महाकाल मंदिरातून अटक करण्यात आले होते. अटकेनंतरही अखिलेश यादव यांनी सरकारला प्रश्न विचारला होता. विकास दुबेला अटक करण्यात आली आहे की त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे, हे स्पष्ट करावे. एवढेच नाही तर त्याच्या कॉल डिटेल्स सार्वजनिक कराव्या, असेही त्यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com