बसपसोबत आघाडीसाठी प्रसंगी जागा सोडू: अखिलेश यादव

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जून 2018

गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील सत्तारूढ भाजपाच्या विरोधात सलग चौथ्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराने विजय मिळविला आहे. नुकतेच भाजपला कैराणामध्ये पराभूत व्हावे लागले होते. सप आणि बसपने भाजपने भाजपच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर आणि केशव प्रसाद मौर्य यांचा फुलपूर मतदारसंघ हे दोन्ही गड जिंकले होते. 

लखनौ : भाजपविरोधात लढण्यासाठी बहुजन समाज पक्षासोबत (बसप) आघाडी करण्याचे समाजवादी पक्षाचे (सप) प्रमुख अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा स्पष्ट करत प्रसंगी आमच्या कोट्यातील काही जागा सोडू, असे म्हटले आहे. त्यामुळे भाजपला आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशात कडवी लढत मिळणार आहे.

मैनपुरी येथे बोलताना अखिलेश म्हणाले, की 2019 च्या राष्ट्रीय निवडणुकीसाठी मायावतींच्या बसप पक्षासोबत आघाडी करण्याची कोणत्याही अटीवर तयारी आहे. यासाठी आम्ही काही जागा सोडाव्या लागल्या तरी आम्ही तयार आहोत. 2019 मध्ये बसपबरोबरचे आमची आघाडी कायम राहील, मला खात्री आहे की, यामुळे भाजप पराभूत होईल. 

गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील सत्तारूढ भाजपाच्या विरोधात सलग चौथ्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराने विजय मिळविला आहे. नुकतेच भाजपला कैराणामध्ये पराभूत व्हावे लागले होते. सप आणि बसपने भाजपने भाजपच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर आणि केशव प्रसाद मौर्य यांचा फुलपूर मतदारसंघ हे दोन्ही गड जिंकले होते. 

बुआ (मायावती) आणि बाबुआ (अखिलेश यादव) एकत्र येत आहेत. ते कुठल्याच मुद्यांच्या आधारे आधारित नाही. त्यामुळे समस्या असणारी आघाडी कधीही कार्य करू शकत नाही. निवडणुकीपूर्वी (२०१९) पर्यंत ते समजेलच असे भाजपचे यूपीचे  मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.

Web Title: Akhilesh Yadav says in Mainpuri alliance with BSP will continue ready to sacrifies seats