UP Assembly Election: अखिलेश यादव यांच्या आक्षेपार्ह पोस्टवरून गोंधळ

धार्मिक स्थळ आणि विशिष्ट धर्माच्या नावाखाली खोटा प्रचार
akhilesh yadav
akhilesh yadavsakal

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून येथील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातही भाजप आणि समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आमनेसामने उभे ठाकल्याने चुरस वाढली आहे. अखिलेश यादव हे भाजपवर सातत्याने हल्ला चढवत आहेत. विरोधक आणि समर्थकांकडून सोशल मीडियावरून विविध पक्षांच्या राजकारण्यांवर टीका केली जात असून, आक्षेपार्ह शेरेबाजी केली जात आहे. (UP Election 2022)

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याबाबतचे प्रकरण समोर आले आहे. अनेक फेसबूक आयडीवरून माजी मुख्यमंत्र्यांचा फोटो इंटरनेटवर प्रसिद्ध करून आक्षेपार्ह पोस्ट लिहिण्यात आल्या आहेत. (UP Assembly Election 2022)

अनेक दिवसांपासून अखिलेश यादव यांचे फोटो व्हॉट्सअॅप आणि फेसबूकच्या माध्यमातून पोस्ट करण्यात येत होते. त्यांच्या नावाचा गैरवापर करून धार्मिक स्थळ आणि विशिष्ट धर्माच्या नावाखाली खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप सुरू आहे. रितेश साहू यांनी कृष्णनगर कोतवालीमध्ये याबाबत तक्रार दिली आहे.

akhilesh yadav
Punjab : 4 आमदारांची तिकिटे कापली,बॉलिवूड स्टारच्या बहिणीला संधी

या पोस्टनंतर समाजवादी पक्षाच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी असून, पोस्ट लिहिणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. हा संदेश अनेकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे लोक करत आहेत. यासोबतच असा चुकीचा मेसेज पसरवणाऱ्यावर सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे.

अफवा पसरवणाऱ्यांवर एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी रितेश साहू यांनी केली. आशु सिंग आणि शिव प्रताप सिंग यांच्या नावे तीन मोबाईल क्रमांक आणि फेसबूक आयडीची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली आहे. याबाबत लखनऊ पोलस शोध घेत असून, इंटरनेटवरही करडी नजर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com