निवडणुकीनंतर भाजपला 'उलटे आसन' करावे लागणार

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची टीका

लखिमपूर खेरी- "विधानसभा निवडणुकीत लोक जेव्हा भाजपच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान करतील तेव्हा त्यांना "उलटे आसन' करावे लागेल,'' अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज टीका केली. आघाडी झाल्यानंतर आज प्रथमच त्यांनी कॉंग्रेस नेत्यासह जाहीर सभा घेतली.

या वेळी कॉंग्रेसचे नेते प्रेम प्रकाश अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते. या निवडणुकीत समाजवादी पक्ष व कॉंग्रेसची आघाडी झालेली आहे. अखिलेश यादव म्हणाले, ""आता "हाताची' साथ लाभल्याने आमची "सायकल' जास्त वेगाने पळेल. योगामध्ये एक "उलटे आसन' नावाचे आसन आहे. निवडणुकीनंतर भाजपला तेच करावे लागणार आहे.''

भाजपवर टीका करताना ते म्हणाले, "" बघा हे लोक आपली कशी दिशाभूल करीत आहेत. नोटाबंदीमुळे रांगेत उभे राहून आपण वाईट दिवस कसे आहेत, हे पाहिले आहेत. मला सांगा अच्छे दिन कोठे आहेत. देशाचा वेगाने विकास होईल असे वाटले होते. मात्र, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था मागे रेटली गेली. आकडेवारीवरून ते स्पष्ट झाले आहे. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्याऐवजी पाचशे व हजारच्या नोटा भरतानाच मोठा भ्रष्टाचार झाला. सारा देश रांगेत उभा होता. त्या वेळी केवळ समाजवादी पक्षानेच रांगेत बळी गेलेल्या लोकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली.''

बहुजन समाज पक्षावर टीका करताना ते म्हणाले, "" या पक्षाची जेव्हा सत्ता होती, त्या वेळी त्यांनी विकासकामे करण्यापेक्षा केवळ पुतळे उभारण्यावरच भर दिला.''

Web Title: Akhilesh Yadav's attack on bjp