अखिलेश यादव म्हणतात, 'ऑल इज वेल'

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

अखेर अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपल यादव व आझम खान यांच्यासह मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांना पक्षाचा जाहीरनामा देत असल्याचे फोटो फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध केला.

लखनौ - समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वडील मुलायमसिंह यादव यांची भेट घेऊन त्यांना पक्षाचा जाहीरनामा दिल्याचा फोटो फेसबुकवर प्रसिद्ध करत सर्वकाही 'ऑल इज वेल' असल्याचे म्हटले आहे.

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी रविवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. या कार्यक्रमाला मुलायमसिंह यादव व शिवपाल यादव अनुपस्थित होते. त्यामुळे पिता-पुत्रांमधील वाद अद्यापही सुरुच असल्याची चर्चा सुरु झाली होती.

अखेर अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपल यादव व आझम खान यांच्यासह मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांना पक्षाचा जाहीरनामा देत असल्याचे फोटो फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध केला. यावेळी पिता-पुत्रांमध्ये सुमारे 40 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. आझम खान यांनी यापूर्वीही पिता-पुत्रांच्या वादामध्ये मध्यस्थाची भूमिका निभावली होती.

Web Title: Akhilesh Yadav's Facebook Post Says All Is Well