उत्तर प्रदेशात पुन्हा आमचीच सत्ता- अखिलेश यादव

वृत्तसंस्था
रविवार, 11 डिसेंबर 2016

लखनौ: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा आमचीच सत्ता येणार असून आम्ही इतिहास घडवू असा विश्‍वास आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांनी भाजपच्या नोटाबंदीवर उपहासात्मक थट्टा करत विकासाच्या मुद्यावर आम्ही सत्तेत टिकून राहू असे म्हटले.

पोलिसांतर्फे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले की, लोकांना त्रास देणारेच आज निवडणुकीपासून लांब पळताना दिसत आहेत. परंतु, आज सर्वांनाच निवडणुकीच्या तारखा जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे, यामध्ये सर्वात जास्त उत्सुक मी आहे. कारण मी निवडणुकीसाठी सज्ज आहे, मी जेव्हा लखनौ मेट्रोच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखविला तेंव्हापासूनच मी निवडणुकीसाठी तयार असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. लोकांनी आमचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही असे मत नोंदविले तेव्हाच मी माझ्या कामाला सुरवात केली होती. आम्ही या वेळी इतिहास घडवू आणि पुन्हा सत्तेत येऊ अशी आम्हाला खात्री असून तुमच्यासोबत पुन्हा एकदा भविष्यातील धोरणे ठरविण्यासाठी बसण्याची संधी आम्हाला मिळेल याची खात्री असल्याचे अखिलेश यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Akhilesh Yadav's statement