अखिलेश यांचे केंद्रावर टीकास्त्र

पीटीआय
सोमवार, 5 डिसेंबर 2016

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या "कॅशलेस सोसायटी'च्या संकल्पनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज जोरदार टीका केली. या संकल्पनेची ग्रामीण भागात अंमलबजावणी करण्यासाठी मोदींनी कुठली पावले उचलली आहेत? असा सवाल अखिलेश यांनी केला.

"डिजिटल इंडिया'साठी सरकारने नेमकी कुठली पावले उचलली आहेत? कॅशलेस व्यवहार कसे करावेत, याचे प्रशिक्षण कोण देणार आहे? खेड्यांमध्ये ही सेवा कशी पोचणार? युवकांचे ठीक आहे, पण ज्येष्ठांचे काय, त्यांनी काय करायचे? अशा प्रश्नांचा भडिमार करत अखिलेश यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपच्या उत्तर प्रदेशातील यात्रा नोटाबंदीमुळे अपयशी ठरल्या असल्याचा दावाही या वेळी अखिलेश यांनी केला.

Web Title: Akhilesh's center criticized