अखिलेश यादव यांच्या जनता दरबारात चेंगराचेंगरी

पीटीआय
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

इटावा - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज आयोजित केलेल्या जनता दरबारात मोठ्या प्रमाणात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जण जखमी झाले. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाउसमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आपला अर्ज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली, असे पोलिसांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी आलेले काही पत्रकारही यामध्ये जखमी झाले. सर्व जखमींना येथील सैफई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ज्या वेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना भेटण्यास सुरवात केली; त्या वेळी गर्दी मोठ्या प्रमाणात त्यांच्याबाजूने सरकली त्या वेळी चेंगराचेंगरी झाली.
 
Web Title: akhilesh's janta darbar witness stampede