अखिलेश यादव यांची भाजप, बसपवर टीका

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

लखनौ - उत्तर प्रदेशमधील पूर्वीचे सरकार जातीयवादाच्या धोरणांवर आगामी विधानसभा निवडणूक लढवित असून, नंतरचे सरकार त्यांच्या काळात पुतळे उभे करण्यासाठी जमीन हडप करण्यात गुंतले होते, अशी टीका मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजप व बहुजन समाज पक्षावर केली.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील पूर्वीचे सरकार जातीयवादाच्या धोरणांवर आगामी विधानसभा निवडणूक लढवित असून, नंतरचे सरकार त्यांच्या काळात पुतळे उभे करण्यासाठी जमीन हडप करण्यात गुंतले होते, अशी टीका मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजप व बहुजन समाज पक्षावर केली.

दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना स्टीलचे ताट व पेला वाटप कार्यक्रमाप्रसंगी अखिलेश यादव बोलत होते. निवडणूक प्रचारात भाजपचे नेते काय बोलतील, याचा भरवसा नसल्याने या पक्षापासून सावध राहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लखनौमधील भाषण, तर भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी गुरुवारी (ता.27) इटवाह येथे दिलेली "जय श्रीराम'ची घोषणा याचा उल्लेख करीत अखिलेश म्हणाले,"" हे लोक पूर्वी वेगळी घोषणा देत होते. "भारत माता की जय', या घोषणेने ते भाषण संपवित होते. मग आता काय झाले? म्हणूनच आपल्याला त्यांच्यापासून अधिक सावध राहायला हवे.''

विकासाबाबत बोलताना ते म्हणाले, लखनौसाठी तुम्ही काय केले, असे मला भाजप व त्यांच्या नेत्यांना विचारायचे आहे. दोन सरकारची तुलना विकासकामांवरून केली, तर समाजवादी पक्षाच्या सरकारशी तुम्ही ती करू शकणार नाही.'' भाजप नेत्यांचे अनेक अवघड शब्दप्रयोग सामान्यांना कळत नाहीत. "सर्जिकल स्ट्राइक' काय आहे, हे समजून घेण्यासाठी मला स्वतःला "गुगल'चा आधार घ्यावा लागला, अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली उडविली.

बहुजन समाज पक्षाला लक्ष्य करताना अखिलेश यादव म्हणाले, या पक्षाच्या सत्ताकाळात त्यांनी मोक्‍याच्या जागा हडप केल्या आणि त्यावर पुतळे उभारले. बसपच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांचे स्वतःचे पुतळे लखनौत ठिकठिकाणी उभारले आहेत. त्यावर बोलताना "आपल्या हयातीत स्वतःचे पुतळे उभारावेत, असे त्यांना का वाटले? असा सवाल त्यांनी केला.

Web Title: Akhillesh Yadav critisized BJP, BSP