'अकिरा' दैनिकातील 'ते' वृत्त केवळ योगायोग!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

राजकोट : येथील "अकिरा'त या गुजराती वृत्तपत्रात काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेली पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा रद्द केल्याची बातमी हा केवळ योगायोग असल्याची माहिती "अकिरा'च्या संपादकांनी दिली आहे.

राजकोट : येथील "अकिरा'त या गुजराती वृत्तपत्रात काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेली पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा रद्द केल्याची बातमी हा केवळ योगायोग असल्याची माहिती "अकिरा'च्या संपादकांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याची बातमी 1 एप्रिल 2016 रोजी राजकोट येथील "अकिरा' या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. हा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. तसेच गुजरातमध्ये ही बातमी माहित होती असेही मेसेज फिरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर "साम' वाहिनीने "अकिरा'च्या संपादकांशी संपर्क साधला. यावेळी बोलताना संपादक किरीटभाई म्हणाले की, "मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की हा एक योगायोग आहे. कारण दरवर्षी येथील गुजराती दैनिक आपल्या वाचकांना "एप्रिल फूल' करण्यासाठी काही तरी बातमी देतात. याच निमित्ताने आम्ही 500 आणि 1000 ची नोट रद्द होऊ शकते असे वृत्त दिले होते. योगयोगाने हे वृत्त खरे ठरले आणि लोक चौकशी करू लागले की "अकिरा'मध्ये हे वृत्त कसे प्रसिद्ध झाले. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो की एवढी मोठी गोष्ट जर कोणाला जाहीर करायची होती तर राजकोटमधून प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या छोट्या वृत्तपत्राला का देतील? द्यायची असेल तर एखाद्या राष्ट्रीय वृत्तपत्राला देतील. आणि आमच्याकडे तर दरवर्षीच बातमी दिली जाते. तसेच आम्ही बातमीमध्ये एक एप्रिल असल्याने ही बातमी दिली असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.' तसेच 'मी अकिराच्या वतीने आपणा सर्वांना सांगू इच्छितो की हा केवळ योगायोग आहे' असे किरीटभाई यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Akira news is only coincident

व्हिडीओ गॅलरी