अक्षरधाम मंदिर हल्ल्यातील आरोपीला 15 वर्षांनंतर अटक 

वृत्तसंस्था
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षरधाम मंदिराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर दोन दिवसांनी रशीदला अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 

अहमदाबाद : गुजरातमधील अक्षरधाम मंदिरांवर 15 वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यातील आरोपी अजमेरी अब्दुल रशीद याला अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षरधाम मंदिराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर दोन दिवसांनी रशीदला अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 

2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या हल्ल्यातील सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. तर त्यातील तीन जणांनी ''पोटा'' न्यायालयाने फाशीची तर एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, या निर्णयाला 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. 2002 मध्ये अक्षरधाम मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चौकशीवेळी आता अटक केलेल्या रशिदचा भाऊ अजमेरी आदम याला अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विमानतळावरुन अटक केली होती. 

24 सप्टेंबर 2002 रोजी झालेल्या या हल्ल्यात 32 लोक मारले गेले होते. तर 80 पेक्षाही जास्त जखमी झाले होते. 28 भक्तांबरोबरच तीन कमांडो आणि राज्य राखीव दलाच्या एका जवानाचा मृतांमध्ये समावेश होता. यावेळी दोन सशस्त्र हल्लेखोरांनी मंदिरावर हल्ला केला. या हल्ल्यात हल्लेखोरांनी स्वंयचलित शस्त्रे आणि हातबॉम्बचा वापर केला होता.

Web Title: Akshardham Temple terror attack accused Ajmeri Abdul Rashid arrested after 15 years