आता अक्षय कुमारही देतोय अमित शहांना सल्ले!

वृत्तसंस्था
बुधवार, 18 डिसेंबर 2019

सध्या राजकीय व सामाजिक घडामोडींवर भाष्य केल्याने अभिनेता अक्षय कुमार चर्चेत आहे. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय, ते म्हणजे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सल्ला दिल्याने.

नवी दिल्ली : सध्या राजकीय व सामाजिक घडामोडींवर भाष्य केल्याने अभिनेता अक्षय कुमार चर्चेत आहे. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय, ते म्हणजे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सल्ला दिल्याने. अक्षयने पंतप्रधान मोदींची घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली होती. त्यानंतर अमित शहांना सल्ला दिल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही गोष्ट सांगितली. या मुलाखतीनंतर अमित शहा यांचे सेशन होते, ते कळल्यावर अक्षय तेथे थांबला. शहा आल्यानंतर प्रेक्षकांनी अक्षय कुमारने शहांची मुलाखत घ्यावी असे सुचवले. तसेच शहांना अक्षयने सल्ला देण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी खूप विचार करून अक्षयने अमित शहांना एक सल्ला दिला. अक्षय अमित यांना सल्ला देणार म्हणजे तो नक्कीच मोलाचा असेल...

अक्षय कुमारने लाईक केले भाजपविरोधातील ट्विट अन् मग....

अक्षयने अमित शहांना सल्ला दिला की, त्यांनी संध्याकाळी साडेसहानंतर जेवू नये. आपल्या शास्त्रांनुसार सूर्यास्तानंतर जेवू नये, असे सांगितले आहे. फीट राहण्यासाठी हा खूप महत्त्वाचा उपाय आहे. असे केल्यास अमितजी फिट राहू शकतात. तसेच ते देशातील अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. असेही अक्षयने यावेळी सांगितले. 

नाट्यवादळ विसावले!

अक्षयने यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. यात त्याने मोदींना आंबा कसे खाता असे विचारले होते, त्यांची ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तसेच यावेळी त्याने अमित शहांना आंबा आवडतो का स्ट्रॉबेरी असाही प्रश्न विचारला. 

Image result for akshay kumar amit shah


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar gave important suggestion about health to Amit Shah