नागरिकत्त्वाबाबत अक्षयने दिले 'हे' उत्तर

नागरिकत्त्वाबाबत अक्षयने दिले 'हे' उत्तर

मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान अभिनेता अक्षय कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. त्याच्या या मुलाखतीनंतर त्याच्या नागरिकत्त्वाबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर आता अक्षय कुमारने याबाबत मौन सोडले असून, त्याने ट्विटरवर आपले उत्तर दिले. 

यामध्ये अक्षय कुमारने ट्विटरवरून सांगितले, की 'माझ्या नागरिकत्वाबाबत विनाकारण नकारात्मक संदेश का पसरविले जात आहेत. मी माझ्या कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत कोणतीही माहिती लपविली नाही. माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्टही आहे. मात्र, मागील 7 वर्षांत मी एकदाही कॅनडाला गेलो नाही. मी भारतात राहतो. येथे काम करतो आणि भारतातच कर भरतो. तसेच माझ्या देशावर माझे किती प्रेम आहे, हे दाखविण्याची गरज मला कधी भासली नाही. 

दरम्यान, अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींची मुलाखत घेतल्यानंतर काही पत्रकारांनी अक्षय कुमारला नागरिकत्त्वाबाबत प्रश्नही विचारला होता. मात्र, त्यावर अक्षयने उत्तर देण्याचे टाळले होते. मात्र, आता अक्षयने याबाबत ट्विटरवरून उत्तर दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com