अक्षय-ट्विंकल आमच्या भावनांशी खेळले; नौदल अधिकाऱ्यांचा आरोप

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

'रूस्तम' चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमारचा नौदल अधिकाऱ्याचा गणवेश हा लिलावात ठेऊन विकल्यामुळे अकरा लष्कर अधिकारी व इतर आठ अधिकाऱ्यांनी ही सूचना पाठवली.

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार व त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांच्यावर लष्करी अधिकाऱ्यांनी 'आमच्या भावनांशी खेळत' असल्याचा आरोप करत कायदेशीर सूचना पाठवली आहे. 'रूस्तम' चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमारचा नौदल अधिकाऱ्याचा गणवेश हा लिलावात ठेऊन विकल्यामुळे अकरा लष्कर अधिकारी व इतर आठ अधिकाऱ्यांनी ही सूचना पाठवली.

या अधिकाऱ्यांमध्ये एक नौदल अधिकाऱ्याची पत्नी व सात निवृत्त अधिकारी ही समाविष्ट आहेत. अक्षय कुमारने या चित्रपटात नौदल अधिकाऱ्याचा खरा गणवेश घातला होता. त्यात तो गुन्हेगार दाखवला होता. त्यामुळे या नौदल गणवेशचा हा अवमान आहे. गणवेशवर वापरण्यात आलेले बॅजेस हे ही मूळ असल्याने याचा गैरवापर होऊ शकतो. या अशा गोष्टींमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे, असे या सूचनेत म्हणले आहे.  

या सूचनेची प्रत, जिथे लिलाव झाला- सॉल्ट स्काऊट व संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात पाठविण्यातल आली आहे. या सूचनेतून अशी मागणी करण्यात आली आहे की, चित्रपटांमधून लष्कराचे गणवेश वापरणे व त्यानंतर ते लिलावात विकणे अशा घटनांवर त्वरित कारवाई व्हावी. हे लष्करासाठी अत्यंत अपमानकारक आहे, त्यामुळे अभिनेत्यांना असे करण्यापासून रोखणे गरजेचे आहे.

rustam

अक्षय कुमारने असे वागून लष्कराप्रती अनादर दाखवला आहे. तसेच लष्करातील अधिकाऱ्यांच्या, विधवा पत्नींच्या, निवृत्त अधिकाऱ्यांच्या भावना या लिलावमुळे दुखावल्या गेल्या आहेत. हा गणवेश 26 एप्रिलला लिलावात ठेवण्यात आला. त्यानंतर एका लष्करी अधिकाऱ्याने असे न करण्याची विनंती अक्षयची पत्नी ट्विंकलला केली होती. तसेच असे न केल्यास त्यांना कोर्टात खेचण्याचीही भाषा केली होती.    

Web Title: Akshay Twinkle Playing With Sentiments Of Armed Forces legal notice