अक्षयकुमार कमाईतही ‘खिलाडी’

Actor Income
Actor Income

नवी दिल्ली - औद्योगिक मासिक ‘फोर्ब्स’ने २०१९ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील अभिनेत्यांची यादी जाहीर केली असून, त्या यादीत अक्षयकुमारचे नाव सलग दुसऱ्या वर्षी चमकले आहे. ‘खिलाडी’ अक्षयने ‘ॲव्हेंजर्स’चे ख्रिस इव्हान्स, पॉल रूड आणि विल स्मिथ यांच्यावर मात करीत यादीत चौथा क्रमांक पटकाविला आहे. 

‘फोर्ब्स’च्या नोंदीनुसार १ जून २०१८ पासून १ जून २०१९ या काळात अक्षयची कमाई सुमारे ६ कोटी ५० लाख डॉलर (४६५ कोटी रुपये) होती. गेल्या वर्षी बॉलिवूड स्टार सलमान खान यानेही जगातील सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले होते. या वर्षी मात्र सलमान खान यादीत स्थान मिळवू शकलेला नाही. हॉलिवूडमधील निर्माता आणि ‘बेवॉच’चा अभिनेता ड्‌वेन जॉन्सनने कमाईत बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस हेम्सवर्थ याचे नाव आहे.

‘माव्हर्ल्स’च्या कलाकारांपैकी एक असलेल्या ख्रिसची कमाई सात कोटी ६४ लाख डॉलर आहे. ‘थोर’चा नायक रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर हा तिसऱ्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com