
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागांत मदिराप्रेम जास्त; सर्वेक्षणाचा निष्कर्ष
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला आणि पुरुषांचं दारू पिण्याचं प्रमाण जास्त आहे. हा दावा आमचा नसून २०१९-२१ या काळात केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. (Alcohol Consumption in India)
१५ आणि त्यावरील वयोगटातल्या १ टक्के महिला मद्यपान करत असून त्याच वयोगटातले १९ टक्के पुरुष मद्यपान करत असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
हेही वाचा: मद्यपान केल्याने मेंदूवर परिणाम होतो का? रिसर्च सांगतो...
यामध्ये ग्रामीण भागातल्या महिलांचं प्रमाण १.६ टक्के असून शहरी भागातल्या महिलांचं प्रमाण ०.६ टक्के आहे. तर ग्रामीण भागातले १९.९ टक्के पुरुष मद्यपान करत असून शहरी भागातले १६.५ टक्के पुरुष मद्यपान करतात.
मद्यपान करणाऱ्या स्त्री व पुरुषांची सर्वाधिक संख्या अरुणाचल प्रदेशात आहे. तिथे ५३ टक्के पुरुष मद्यपान करत असून महिलांचं प्रमाण २४ टक्के आहे. केरळ, जम्मू काश्मीरमध्ये मद्यपानाचं प्रमाण सर्वात कमी म्हणजे ०.२ टक्के आहे. (Arunachal pradesh highest alcohol consumption)
Web Title: Alcohol Consumption In India More In Rural Area Than Urban Area
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..