'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू'

वृत्तसंस्था
रविवार, 23 सप्टेंबर 2018

दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशात वर्षाला दारुमुळे 2.60 लाख जणांचा मृत्यू होतो. या लोकांना यकृताच्या समस्या, कर्करोग असे आजार उद्भवतात. तसेच दारु पिऊन गाडी चालवल्याने अपघात होतात, व त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो.

नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशात वर्षाला दारुमुळे 2.60 लाख जणांचा मृत्यू होतो. या लोकांना यकृताच्या समस्या, कर्करोग असे आजार उद्भवतात. तसेच दारु पिऊन गाडी चालवल्याने अपघात होतात, व त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो.

जगात दिवसाला दारु पिण्यामुळे 6 हजार जण मृत्युमुखी पडतात. यातील 28 टक्के हे वाहनांचे अपघात, स्वत:ला इजा करुन घेणे आणि हिंसा यामुळेच होतात. तर 21 टक्के पचनाच्या तक्रारीमुळे होतात. 19 टक्के लोकांना हृदयाशी संबंधित तक्रारी उद्भवतात. तर बाकीच्यांना कर्करोग आणि इतर तक्रारी उद्भवतात आणि त्यांना मृत्यूना सामोरे जावे लागते.

भारतात वर्षाला होणाऱ्या एकूण अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 1 लाख लोकांचे मृत्यू हे अप्रत्यक्षरित्या दारुमुळे होतात. तर कर्करोगामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 30 हजार जण दारु घेत असल्याचे या संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. तर यकृताच्या आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असून त्यामुळे 1.4 लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे तरुणांना या व्यसनापासून दूर ठेवणे हे येत्या काळातील मोठे आव्हान आपल्या देशासमोर असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Alcohol Results in Death of 2.6 Lakh Indians Every Year