
दिल्लीत पहाटे तीनपर्यंत मद्यसेवेस परवानगी
नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने राजधानी दिल्लीतील रेस्टॉरंट आणि बारमध्ये पहाटे तीन वाजेपर्यंत मद्य पुरविण्यास परवानगी दिली आहे. संबंधित संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले असून सरकारचे हे प्रागतिक पाऊल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तडाख्यातून हॉटेल व्यवसाय अद्याप सावरलेला नाही. गेल्या दोन वर्षांतील तोटा भरून काढण्यास यामुळे हातभार लागेल अशी व्यावसायिकांना आशा आहे.
नॅशनल रेस्टॉरंट््स असोसिएशन ऑफ इंडियाचे खजिनदार मनप्रीतसिंग यांनी सांगितले की, या निर्णयामुळे राजधानीत रोजगार निर्मिती होईल आणि व्यवसायही मिळेल. दिल्ली हे पर्यटन केंद्र आहे. त्यामुळे नाईटलाईफ वाढण्यास चालना मिळेल. राजधानीतील हॉटेल, पब लवकर बंद होत असल्यामुळे दिल्लीकरांना गुरुग्राम, नोएडा शहरांत जावे लागायचे. आता हे थांबेल. आता हे लोक दिल्लीतच नाईटलाईफचा आनंद लुटू शकतील. आता आम्हाला जास्त वेळ रेस्टॉरंट सुरु ठेवावी लागतील. त्यामुळे जास्त कर्मचारी लागतील. साहजिकच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
Web Title: Alcohol Service Is Allowed In Delhi Till 3 Am
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..