अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात अलर्ट जारी

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात अलर्ट जारी

प्रयागराज : अयोध्या प्रकरणाचा युक्तिवाद पूर्ण झाला. आता याप्रकरणी निकाल काही दिवसांत अपेक्षित आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

अयोध्या प्रकरणी निकालाबाबत किंवा त्यासंदर्भात अफवा पसरवू नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. गृह विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येत कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. काशी, मथुरेसह इतर प्रमुख धार्मिक स्थळांवर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 20 ऑक्टोबरपर्यंत
अतिरिक्त सुरक्षा पथक अयोध्येत पोहोचेल. सुरक्षेच्या कारणास्तव यापूर्वीच खबरदारी घेण्यात येत आली आहे.

बॅरिकेड्स लावले

निमलष्करी दलाशिवाय इतर दलाचाही सुरक्षा व्यवस्थेत समावेश आहे. तसेच अयोध्येच्या बाजूने जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवरही बॅरिकेड्स लावण्यात येत आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांकडून पाहणी 

मुख्य सचिव आर. के. तिवारी आणि अप्पर मुख्य सचिव (गृह) अवनिश कुमार असवस्थी आणि पोलिस महासंचालक (डीजीपी) ओ. पी. सिंह यांनी दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला.

अफवा पसरवू नये : आयजी कुमार

पोलिस महानिरीक्षक (आयजी) प्रवीण कुमार यांनी सांगितले, की सणानिमित्त या भागात नेहमी अलर्ट जारी केला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षेबाबत कोणतीही अफवा पसरू नये. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com