विषारी दारु प्यायल्याने यूपीत आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू

poisonous liquor
poisonous liquorSakal
Summary

अलीगडमध्ये विषारी दारू प्यायल्याने मरणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत 85 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे, तर 71 मृतदेहांचं पोस्टमार्टम झालं आहे.

अलीगड- अलीगडमध्ये विषारी दारू प्यायल्याने मरणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत 85 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे, तर 71 मृतदेहांचं पोस्टमार्टम झालं आहे. याकाळात उत्पादन आयुक्त पी. गुरुप्रसाद यांना हटवण्यात आलंय आणि आयएएस अधिकारी रिग्जियान सैलिय यांना याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण, एसीएस उत्पादन शुल्क अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये. (Aligarh Hooch Tragedy 85 people died uttar pradesh yogi adityanath)

आतापर्यंत 85 लोकांचा मृत्यू

अलीगड विषारी दारू प्रकरणी अपर मुख्य सचिव उत्पादन संजय आर भूसरेड्डी यांनी उत्पादन आयुक्त गुरुप्रसाद यांना पदावरुन हटवलं आहे. याशिवाय आग्रा झोनचे संयुक्त आयुक्त आणि अलीगड मंडलचे उपायुक्त यांच्यासह पाच जणांचे निलंबन केलं आहे. सोमवारी 14 जणांना मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून मृतांच्या संख्येत वाढ होतेय.

poisonous liquor
तिसऱ्या लाटेचे सावट; लस किती काळ कोरोनापासून ठेवते सुरक्षित?

गुरुवारपासून विषारी दारू पिल्याने लोकांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपर मुख्य सचिवांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर संजय आर भूसरेड्डी यांनी आतापर्यंत 5 जणांचे निलंबन केले आहे. कारवाई केवळ अलीगडमधील अधिकाऱ्यांवर झाली नाही तर आग्रामध्येही झाली आहे.

पोलिसांवरही कारवाई

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर काही पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. ज्यात गभाना सीओ कर्मवीर सिंह यांना निलंबित करण्यात आलंय. दुसरीकडे खैर शिवप्रताप सिंह आणि विशाल चौधरी यांना तीन दिवसात स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. दरम्यान, अनेकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. शिवाय मृतांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com