'राजीव गांधींचा भारतरत्न काढून घ्या '

वृत्तसंस्था
शनिवार, 22 डिसेंबर 2018

दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी दिल्ली सरकारने याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयास लेखी स्वरूपात सांगावे, असेही या ठरावात नमूद करण्यात आले आहे. 
 
नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा "भारतरत्न' सन्मान काढून घेतला जावा, अशी मागणी करणारा ठराव आज दिल्लीतील विधिमंडळात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.  मात्र, आपने याची मागणी करणाऱ्या अलका लांबा यांचा राजीनामा मागितला आहे.

या ठरावात 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीसाठी राजीव गांधी यांना जबाबदार ठरविण्यात आले असून, ही दंगल वंशच्छेद होती, असा आरोप करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे आमदार जर्नेलसिंग यांनी यासंबंधीचा ठराव मांडला होता.

दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी दिल्ली सरकारने याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयास लेखी स्वरूपात सांगावे, असेही या ठरावात नमूद करण्यात आले आहे. 
 
Web Title: Alka Lamba Asked To Quit AAP In Row Over Rajiv Gandhi Resolution