शुजात बुखारींच्या हल्लेखोरांची ओळख पटली ; पोलिसांची माहिती

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

'रायझिंग काश्मीर'चे मुख्य संपादक असलेले 48 वर्षीय बुखारी यांची 14 जूनला हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी कारमध्ये असलेले बुखारींवर गोळ्या झाडल्या.

श्रीनगर : ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी काश्मीरच्या दोन आणि पाकिस्तानच्या एकाला अटक करण्यात आली. या हत्येप्रकरणातील तिघांची ओळख पटल्याचे जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले. 

'रायझिंग काश्मीर'चे मुख्य संपादक असलेले 48 वर्षीय बुखारी यांची 14 जूनला हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी कारमध्ये असलेले बुखारींवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. बुखारींच्या हत्येनंतर याप्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाचे (एसआयटी) पोलिस महासंचालकांकडे देण्यात आला होता. त्यानंतर एसआयटीने यातील आरोपींना अटक केली. आता या हल्लेखोरांची ओळख पटली असून, यातील दोन हल्लेखोर काश्मीरचे असून, इतर एक पाकिस्तानचा आहे. 
 
दरम्यान, या हल्लेखोरांचे छायाचित्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणाचा उलगडा झाला असून, हल्लेखोरांची ओळखही पटली आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: All 3 accused in Shujaat Bukhari murder identified say Jammu and Kashmir police