अपहृत विमानातील सर्व प्रवाशांची सुटका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

व्हॅलेट्टा - लीबियातील सभा येथून त्रिपोलीला निघालेल्या एअरबस ए320 या विमानाचे अपहरण झाल्यानंतर त्यातील सर्व 118 जणांची सुटका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशांतर्गत विमानसेवा देणारे हे विमान माल्टाच्या भूमध्य बेटांवर उतरविण्यात आल्याची माहिती माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कत यांनी ट्‌विटरवरून दिली होती.

आफ्रिकिया एअरवेजच्या या विमानात कर्मचाऱ्यांसह एकूण 118 लोक होते, सुरवातीला महिला आणि लहान मुलांना विमानातून सोडण्यात आले होते. त्यानंतर टप्याटप्प्याने सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली. या विमानाचे अपहरण का करण्यात आले व अपहरणकर्त्याच्या काय मागण्या आहेत, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे विमान माल्डात उतरल्यानंतर दोन अपहरणकर्त्यांनी हातबॉंबच्या साहाय्याने ते उडवून देण्याची धमकी दिली होती. यानंतर त्यांनी सर्व 111 प्रवाशांना आम्ही सोडू; परंतु आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय विमानावरील कर्मचाऱ्यांना आम्ही सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

Web Title: All all secured of hijacked plane