काँग्रेसचे सर्व आरोप खोटे, निराधार: भाजप

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयाला पन्नास दिवस पूर्ण होत असतानाच काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. नोटाबंदीचा निर्णय हा सर्वांत मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर, हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हणत भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला भाजपवर टीका करताना म्हणाले, 'नोटाबंदीचा निर्णय हा देशातील सर्वांत मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे. हा निर्णय घेताना भाजपने या निर्णयाबाबत बिहार, ओडिशा आणि अन्य ठिकाणांच्या भाजप शाखांना दिली होती. त्यामुळे या ठिकाणी नोटाबंदीपूर्वी बॅंकांत मोठी रक्कम जमा झाली असून संपत्ती खरेदी करण्यात आली होती. सरकारने याचे उत्तर द्यायला हवे.' नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी 6 जानेवारीपासून काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या या आंदोलनाची सुरूवात 6 जानेवारी रोजी होणार आहे.

हे सर्व आरोप फेटाळून लावताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, "काँग्रेसला सर्व गोष्टी एकाच चष्म्यातून बघण्याची सवय लागली आहे. काँग्रेस ने केलेले सर्व आरोप खोट आणि निराधार आहेत.'

Web Title: All allegations of Congress is wrong : Ravi Shankar Prasad