गोव्यात अकाउंटंच्या परीक्षेत सर्व उमेदवार नापास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

गोवा सरकारच्या लेखा खात्यात लेखाधिकाऱ्यांच्या (अकाउंटंट) 80 पदांसाठी 7 जानेवारी रोजी घेतलेल्या परीक्षेत सर्व उमेदवार नापास झाले आहेत. 8 हजार जणांनी या पदासाठी परीक्षा दिली होती.
 

पणजी - गोवा सरकारच्या लेखा खात्यात लेखाधिकाऱ्यांच्या (अकाउंटंट) 80 पदांसाठी 7 जानेवारी रोजी घेतलेल्या परीक्षेत सर्व उमेदवार नापास झाले आहेत. 8 हजार जणांनी या पदासाठी परीक्षा दिली होती.

लेखा खात्याच्या संचालकांनी आज जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे परीक्षेतील सर्व उमेदवार नापास झाले आहेत. परीक्षेच्या सात महिन्यांनंतर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये 80 अकाउंटंटच्या पदाची जाहिरात लेखा खात्याने केली होती. त्यानंतर 15293 अर्ज विक्रीला गेले होते तर 10712 जणांनी अर्ज सादर केले होते.

पात्र उमेदवारांसाठी 7 जानेवारी 2018 रोजी परीक्षा झाली होती. परीक्षेला सुमारे 8 हजारच्या आसपास उमेदवार बसले होते. त्यानंतर दोन महिन्यात निकाल अपेक्षित होता पण तो निकाल आज जाहीर झाला. 80 अकाउंटंटच्या पदांमध्ये 43 पदे सर्वसामान्य गटासाठी, 21 ओबीसी, 9 एसटी, 2 एससी, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकांची मुले व माजी सैनिकांसाठी प्रत्येकी 1 पद होते.

Web Title: all candidates failed in Goas account examination

टॅग्स