देशातील सर्व स्मारके, म्युझियम उघडण्यास परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय

Taj Mahal
Taj Mahal
Summary

अनेक राज्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी लादलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. गेल्या महिन्यात दिवसाला 4 लाखापर्यंत नवीन रुग्ण आढळत होते. ती संख्या आता 70 हजारांपर्यंत खाली आली आहे. अनेक राज्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी लादलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असलेली सर्व स्मारके, म्युझियम हे 16 जूनपासून उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांना या ठिकाणी जाता येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या ससंर्गाच्या पार्श्वभूमीवर स्मारके बंद करण्याचे आदेश दिले होते.

केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतीक राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी म्हटलं की, पर्यटन मंत्रालयाने सर्व स्मारके 16 जून 201 पासून उघडण्यास परवानगी दिली आहे. पर्यटकांना कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन करत पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.

Taj Mahal
'नवं गुजरात मॉडेल'; मोदींच्या राज्यात केजरीवाल लढवणार सर्व जागा

पर्यटन मंत्रालयाच्या आदेशानुसार,'पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणारी सर्व स्मारके आणि म्युझियम उघडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तसंच ही स्मारके, म्युझियम ज्या राज्यांमध्ये आहेत तिथल्या नियमावलीचे पालन करावे लागेल.' गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी ताज महालसह सर्व स्मारके आणि म्युझियम बंद करण्यात आली होती. कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राला आणि त्यावर अवलंबून असलेल्यांना मोठा फटका बसला आहे.

Taj Mahal
जेफ बेजोस यांच्यासोबतची अंतराळ सफर; द्यावे लागणार इतके पैसे

देशात गेल्या आठवड्यात संसर्गामध्ये 30 टक्के घट झाली आहे. तसंच गेल्या 24 तासात 70 हजार 421 नवीन रुग्ण आढळले तर 3921 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 लाख 19 हजार 501 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 9 लाख 73 हजार 158 सक्रीय रुग्ण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com