अटलजी हे देशासाठी जगले : नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : 'अटलजी हे स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे देशासाठी, देशवासियांसाठी जगले, आयुष्य कसं जगावं आणि का जगावं याचं ते उत्तम उदाहरण होते. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मार्गदर्शक होते,' अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयींसाठी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत व्यक्त केल्या. 

अटलजी मागील दहा वर्षे कोणत्याही राजकीय कार्यक्रमात आले नाहीत, तरीही लोकांच्या विस्मरणात ते गेले नाहीत, त्यांना तितकीच लोकप्रियता मिळाली. त्यांच्या अंत्ययात्रेलाही लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ते कायम जनसामान्यांचा आवाज म्हणून जगले. सर्वात अवघड व अशक्य अशी पोखरण येथील अणुचाचणी ही केवळ अटलजींमुळे होऊ शकली, असेही मोदींनी सांगितले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वाजपेयी यांनी काश्मीर प्रश्नाबाबत मांडलेल्या भूमिकेमुळे दहशतवाद चर्चेत आला. यामुळे जागतीक पातळीवर काश्मीर प्रश्नाचे कथानकच बदलले, असेही त्यांनी सांगितले. वाजपेयी यांचा स्वतःवर, सर्वसामान्यांवर विश्वास होता. ते थांबले नाहीत, अडखळले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. 

'अटल बिहारींसारखा महान नेता होणे नाही. अटलजींचे कौतुक करावे तितके कमी आहे. ते स्वयंपाकही उत्तम करायचे' अशा आठवणींना त्यांचे जवळचे मित्र आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लाकृष्ण आडवाणी यांनी उजाळा दिला.

कुस्तीपटू बजरंग पुनिया याने आशियाई खेळामध्ये काल सुवर्णपदक मिळवले. पुनियाने मिळवलेले सुवर्णपदक भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले. जीवनाची यापेक्षा मोठी सफलता असू शकत नाही, असेही त्यांनी आवर्जुन नमूद केले.  

Web Title: all parties tribute to atal bihari vajpayee in Delhi