सर्वपक्षीय नेत्यांची राष्ट्रपित्याला आदरांजली 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांना 149व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदरांजली वाहिली. राष्ट्रपित्याने जी मूल्ये अंगीकारली होती, त्यावर निष्ठा ठेवीत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. 

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांना 149व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदरांजली वाहिली. राष्ट्रपित्याने जी मूल्ये अंगीकारली होती, त्यावर निष्ठा ठेवीत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. 

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजघाट येथे गांधीजींच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. "जयंतीनिमित्त गांधीजींना आजरांजली वाहत त्यांच्या अहिंसा, शांतता, बंधुभाव, एकता यांसह राष्ट्रीय प्रगतीसाठी गांधीजींनी ज्या मूल्यांचा अंगीकार केला, त्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे. गांधीजींचा संदेश सर्वांसाठी लागू असून, तो कायम आपल्यला मार्गदर्शक असेल,' असे ट्‌विट कोविंद यांनी केले.

"देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या, अहिंसेचा मार्ग दाखविणाऱ्या गांधींजीच्या मूल्यांची जपणूक करायला हवी, असे मोदी यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. महात्मा गांधी यांच्या उद्दात्त विचारांनी जगातील लाखोंना सामर्थ्य दिले आहे. दुसऱ्यांसाठी जगणारे व आपले जग चांगले बनविणारे ते महनीय होते. राजघाट येथे बापूंना आदरांजली वाहिली,' असे सांगत राजघाट येथील छायाचित्र त्यांनी शेअर केले आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधानांनी विजयघाट येथे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. 

राहुल व सोनिया गांधी यांनीही राजघाटावरील समाधिस्थळावर महात्मा गांधी यांना पुष्पांजली वाहिली. वर्ध्यात कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक असल्याने ते तेथून तातडीने बाहेर पडले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, नायब राज्यपाल अनिल बैजल, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यासह सर्वपक्षीय नेते, खासदार व आमदार, मंत्री यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली. या वेळी राजघाटवर भजन, सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Party Leaders Honors to Gandhiji