लोकसभा निवडणुकीपूर्वी व्हीव्हीपॅट मशिन्स उपलब्ध होतील : निवडणूक आयोग

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जुलै 2018

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 16 लाखांहून अधिक व्हीव्हीपॅट मशिन्सची निर्मिती करण्यात येत आहे. त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीसाठी या मशिन्सचा वापर करण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या 'ऑल व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रायल' (व्हीव्हीपॅट) मशिन्सचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. तसेच व्हीव्हीपॅट मशिन्सची जेवढी मागणी होती, ती मागणी पूर्ण झाली आहे, असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 16 लाखांहून अधिक व्हीव्हीपॅट मशिन्सची निर्मिती करण्यात येत आहे. त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीसाठी या मशिन्सचा वापर करण्यात येणार आहे. या व्हीव्हीपॅटच्या निर्मिती कोणत्याही विलंबाविना करण्यात आली. या मशिन्सच्या उपलब्धतेविषयी निवडणूक आयोगाकडून सातत्याने माहिती घेण्यात येत आहे. 

Web Title: All VVPATs machines will be procured before 2019 Lok Sabha elections