भाजप आमदाराचे पोलिस अधीक्षकांशी गैरवर्तन

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

भाजप आमदाराकडून अशा प्रकारचे करण्यात आलेले वर्तनाची बातमी शहरभर पसरली. बाघम्बरी मठातील साधु संतांबरोबर जेवण करण्यासाठी योगी आदित्यनाथ याठिकाणी आले होते.

अलाहाबाद - उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे एका भाजप आमदाराने थेट पोलिस अधीक्षकांनाच धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या आमदाराने पोलिस अधीक्षकांना धमकी देताना म्हटले, की 'लातों के भूत बातों से नही मानते'.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यादरम्यान भाजप आमदार हर्षवर्धन वाजपेयी यांना रोखणे पोलिस अधीक्षक गंगा पार यांना महागात पडले. हर्षवर्धन वाजपेयी आपल्या समर्थकांसह कार्यक्रमात जात असताना पोलिस अधीक्षकांनी त्यांना रोखले. त्यावेळी हर्षवर्धन यांनी पोलिस अधीक्षकांना शिवीगाळ करत तुम्हाला लाथा घातल्या शिवाय तुम्ही सुधारत नाही असे म्हटले. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

भाजप आमदाराकडून अशा प्रकारचे करण्यात आलेले वर्तनाची बातमी शहरभर पसरली. बाघम्बरी मठातील साधु संतांबरोबर जेवण करण्यासाठी योगी आदित्यनाथ याठिकाणी आले होते. त्यावेळी शक्तीप्रदर्शन करणाऱ्या आमदाराने थेट पोलिस अधीक्षकांनाच शिवीगाळ केल्याने आता त्यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Allahabad BJP MLA threatens SP in CM Yogi Adityanath Allahabad visit