मोहम्मद शमी यांची हत्या; भाजप नेत्यावर गुन्हा

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

शमी यांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्यांच्यावर 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा तपास सुरु आहे. कुंडा आणि अलाहाबादमधून विधानसभा निवडणूक लढलेल्या शमी यांच्या हत्येनंतर समर्थकांनी अलाहाबाद-प्रतापगड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

अलाहाबाद - उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये बहुजन समाज पक्षाचे (बसप) नेते मोहम्मद शमी यांची रविवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी शमी यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक भाजप नेता व अन्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसप नेते मोहम्मद शमी रविवारी रात्री घराकडे जात असताना त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अलाहाबाद शहरापासून 50 किमी अंतरावर असलेल्या मऊआइमा भागात ही घटना घडली. 20 वर्षे समाजवादी पक्षात राहिल्यानंतर मोहम्मद शमी यांनी बसपमध्ये प्रवेश केला होता. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता आहे.

शमी यांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्यांच्यावर 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा तपास सुरु आहे. कुंडा आणि अलाहाबादमधून विधानसभा निवडणूक लढलेल्या शमी यांच्या हत्येनंतर समर्थकांनी अलाहाबाद-प्रतापगड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. उत्तर प्रदेशात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच ही हत्येची घटना घडली आहे.

Web Title: Allahabad: BSP leader Mohd Shami shot dead