आवाज वाढव नव्हे; बंद कर 'डीजे' तुला...

वृत्तसंस्था
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

डीजे वाजवणाऱयांना एक लाख रुपये दंड व पाच वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाणार आहे.

प्रयागराज : उत्तर प्रदेशात ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून डीजे वर बंदी घालण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. डीजे वाजवणाऱयांना एक लाख रुपये दंड व पाच वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाणार आहे.

ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यावेळी न्यायालायने डीजेवर बंदी घालण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. डीजे ज्या भागामध्ये वाजवला जाईल, त्याला जबाबदार त्या भागातील पोलिस अधिकाऱयांना धरले जाणार आहे. शिवाय, व्हॉट्सऍप, ईमेल वरून आलेल्या डीजेच्या तक्रारींबाबत कारवाई केली जाईल. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. ध्वनी प्रदूषणाबाबतच्या आदेशाचे पालन न करणाऱयांविरोधात याचिका दाखल करून घेतली जाईल. सरकारने घालून दिलेल्या नियमानुसारच लाउडस्पिकरचा आवाज ठेवावा लागेल, असेही न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

डी़जेच्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णालयामधील रुग्णांवर परिणाम होतो. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हे चुकीचे आहे. ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या मूळ अधिकाऱयांवर गदा येत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allahabad High Court bans DJ in Uttar Pradesh