सत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

'पॉवर पॉलिटिक्स' करणे हा आमचा उद्देश नव्हता. काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर पाकिस्तानसोबत चर्चा झाली पाहिजे. हा प्रश्न चर्चेने सुटू शकतो हे पीडीपीचे धोरण आहे.

- मेहबूबा मुफ्ती, नेत्या, पीडीपी

जम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती यांनी सांगितले, की पाकिस्तानशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत, असे आमचे मत होते. राज्यात दडपशाहीचे राज्य चालू शकणार नाही. राज्यात फक्त शांततेने काम होऊ शकते. तसेच भाजप आणि पीडीपीची राज्यात जी युती होती. ती युती सत्तेसाठी नव्हती, असेही मुफ्ती म्हणाल्या.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुफ्ती यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुफ्ती म्हणाल्या, राज्यातील तरूणांवरचे गुन्हे मागे घेणे, शांतता राखणे, विकासाची कामे करणे आणि चर्चा करून कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे हा यापूर्वीपासून आमचा अजेंडा होता. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपची युती तुटली याचे मला काही आश्चर्य वाटले नाही. दोन्ही पक्ष एका हेतूने एकत्र आले होते.

पुढे त्या म्हणाल्या, 'पॉवर पॉलिटिक्स' करणे हा आमचा उद्देश नव्हता. काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर पाकिस्तानसोबत चर्चा झाली पाहिजे. हा प्रश्न चर्चेने सुटू शकतो हे पीडीपीचे धोरण आहे.

Web Title: The Alliance with BJP not for Power says Mehbooba Mufti