'युतीतच लढा पण, एकत्र निवडणुका हव्यात'

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई : भाजपसमवेत एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्यातच पक्षाचे हित असल्याची बहुतांश शिवसेना खासदार- आमदारांची भूमिका आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपला शब्द अंतिम असेल, असे सांगतानाच एकत्र लढण्यातच फायदा असल्याचे कोष्टक आमदारांकडून मांडले जात आहे. मात्र भाजपने लोकसभा एकत्रितपणे लढून विधानसभेत वेगळे लढण्याची आगळीक करू नये, यासाठी दोन्ही निवडणुका एकाच वेळी हव्यात, असाही शिवसेनेतील आमदारांचा आग्रह आहे. मात्र 1999 प्रमाणे दोन्ही निवडणुका एकत्र घेऊन सत्ता गमावण्याची वेळ आली होती, ते टाळावे, असे काही ज्येष्ठ मंत्र्यांचे मत आहे.

भाजपने तीन राज्यांतील सत्ता गमावली असली तरी छत्तीसगड वगळता अन्यत्र दारूण पराभव झालेला नाही. हिंदुत्वादी मतांनी एकत्र रहाणे आवश्‍यक असल्याचे शिवसेनेतील काहींना वाटते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जानेवारीत सरकारचा पाठिंबा काढून घेतला जाईल, असे घोषित केले होते. त्यामुळे शिवसेनेत सध्या आगामी घडामोडींबद्दल उत्सुकता आहे. "मातोश्री'वर भेटीला जाणारे आमदार; तसेच खासदारही याबाबत नेतृत्वाशी चर्चा करीत असतात. भाजपच्या सर्व नेत्यांनी युती आवश्‍यक असल्याची भूमिका घेतल्याने शिवसेना जागांच्या आकड्यांबाबत आग्रही राहू शकेल, असेही सांगण्यात येत आहे. भाजपला सोडण्याची नव्हे, तर नामोहरम करण्याची ही वेळ आहे, असे लोकप्रतिनिधींना वाटते. 

सारे काही विठ्ठल दर्शनानंतर 

दरम्यान, याबाबत काहीही बोलण्याची ही वेळ नाही. सध्या आम्ही पंढरपूर वारीच्या तयारीत आहोत, असे सांगण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा, ही प्रार्थना राममंदिराबरोबरच केली जाणार आहे, असे पक्षातीलच एकाने स्पष्ट केले. भाजपतील एका ज्येष्ठ नेत्याने मात्र शिवसेनेने विधानसभेत निम्म्या म्हणजेच 144 किंवा त्यापेक्षा जास्त जागांची मागणी केल्यास ती पूर्ण करणे योग्य ठरेल काय, असा प्रश्‍न केला आहे. 

Web Title: In the alliance itself but together with elections