आघाडीतील पक्षांचे एकमेकांचे आव्हान

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

अलाहाबाद : पहिल्या टप्प्याअंतर्गत निवडणुकीला सामोरे जात असलेल्या अलाहाबादमध्ये काँग्रेस-समाजवादी पक्ष (सप) विरुद्ध भाजप-अपना दल या लढतीबरोबर काही ठिकाणी काँग्रेस विरुद्ध सप, भाजप विरुद्ध अपना दल असा सामनाही रंगणार असल्याचे चित्र आहे.

दोन्ही पक्षांतील नाराज उमेदवारांनी 12 मतदारसंघांतून आपले अर्ज दाखल केले असून, याचा फटका दोन्ही आघाड्यांना बसण्याची शक्‍यता आहे. "सप'कडून मैदानात असलेल्या सत्यवीर यांच्याविरोधात काँग्रेसने जवाहरलाल दिवाकर यांना उमेदवारी दिली आहे; तर याच मतदारसंघातून अपना दलाचे जमुना सरोज व भाजपचे सुरेंद्र कुमारही निवडणूक लढवत आहेत. याव्यतिरिक्त बारा, कोरान येथेही अशा लढती पाहायला मिळणार आहेत.

आई विरुद्ध मुलगा लढत
हांडिया मतदारसंघातून रिंगणात असलेल्या माजी कॅबिनेट मंत्री राकेश धार त्रिपाठी यांच्या पत्नी प्रमिला देवी व चिरंजीव प्रभात यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या आईला पुरेसा अनुभव नसतानाही उमेदवारी देत राजकीय पक्षांनी आपल्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप प्रभात त्रिपाठी यांनी केला आहे. 

Web Title: alliance parties challenge each other